Breaking News

पुणे विद्यापीठात रविवारी मराठवाडा मुक्तीदिन सोहळ्याचे आयोजन

पुणे, दि. 15, सप्टेंबर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठवाडा विद्यार्थी समितीतर्फे मराठवाडा मुक्तीदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी  (दि. 17) दुपारी 1.30 वाजता पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या पी. रे. सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठवाडा  विद्यार्थी समितीतर्फे दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने विविध क्षेत्रांतील उत्तुंग कामगिरी करणार्‍या  मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जाते. या वर्षी या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, खासदार राजीव सातव,  एन्व्हार्यमेंटल पोरम ऑफ इंडीयाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. तर पुण्यातील आयकर विभागाचे उपायुक्त नितीन  पाटील, पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच विवेक मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरिक्षक,  पिं. चिंचवड), डॉ. गणेश राख (मेडीकेअर हॉस्पीटल, पुणे), प्रीतम गंजेवार (युवा उद्योजक, पुणे), ओमकार रापतवार(युवा संगितकार, पुणे) यांचीही यावेळी  उपस्थिती राहणार असल्याची माहिती मराठवाडा विद्यार्थी समितीचे मारूती अवरगंड यांनी दिली आहे. तसेच पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या पी. रे.  सभागृहात होणार्‍या या सोहळ्यास विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.