Breaking News

पंढरपुरातील पुलावरुन पती-पत्नी वाहून गेले; शोध लागेना

सोलापूर, दि. 15, सप्टेंबर - पंढरपूर- भीमा नदीवरील अजनसोंड- मुंढेवाडी या बंधार्‍यावरुन दुचाकीवर जात असताना वाहणार्‍या पाण्याचा अंदाज न आल्याने  अनवलीकडे निघालेले दांपत्य दुचाकीसह पाण्यात वाहून गेले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली. सुरेश बनकर व वंदना बनकर असे  या दांपत्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात पोलिसांकडून शोध सुरु होता मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. अंधारामुळे शोध मोहिमेमध्ये अडचणी  येत होत्या.