Breaking News

हद्दवाढ भागात दिवाळीपर्यंत ड्रेनेजलाइन जोडणी होणार

सोलापूर, दि. 15, सप्टेंबर - राज्यस्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात विशेषत: हद्दवाढ भागात ड्रेनेज लाइन आणि देगाव, प्रतापनगर, कुमठे येथे मलनिस्सारण  केंद्र उभारण्यात येत आहे. ही सर्व कामे 30 सप्टेंबरच्या आत पूर्ण करा, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ड्रेनेज विभागास दिला. या  योजनेअंतर्गत 312 कोटींची कामे होत आहेत. प्रतापनगर येथील मलनिस्सारण केंद्रातील पाणी सोडण्याबाबत अडचणी होत्या. सिंचन विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा  करून सोडवली. कुमठे येथील केंद्रात वीजजोडणीचा मुद्दा टेंडरमध्ये नव्हता. त्याबाबत कार्यवाही करून तेथील प्रश्‍न सोडवला. दोन ठिकाणची जोडणी रेल्वे विभागामुळे  प्रलंबित आहेत. त्याबाबत रेल्वे अधिकार्‍यांसोबत चर्चा करून मार्ग काढला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे,  रेल्वेचे अधिकारी गौतम कुमार, रवींद्र सिंगल, व्ही. व्ही. रामचंदर, एस. के. जैन आदी उपस्थित होते.