Breaking News

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात

औरंगाबाद, दि. 02, सप्टेंबर - औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधाकिशन  पठाडे हे विजयी झाले असून या मुळे तालुक्याच्या राजकारणावरिल भाजपची पकड अधिक मजबुत झाली आहे. औरंगाबादची कृषी उत्पन्न बाजार समिती ही  मराठवाडयातील अर्थिक उलाढालीची महत्वाची संस्था असून ती काँग्रेच्या ताब्यात होती.माजी सभापती संजय औताडे यांच्या विरोधात बावीस तारखेला अविश्‍वास  ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नवीन निवडीसाठी आज शुक्रवार 1 ऑगस्टची तारिख देण्यात आली होती.त्यानुसार आज काँग्रेसकडून राहुल सावंत तर  भाजपकडून राधाकिशन पठाडे यांनी अर्ज दाखल केला होता.आज दुपारी या साठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. एकूण आठरा संचालक मतदान करणार होते  मात्र विकास दांडगे हे एकमेव संचालक तटस्थ राहिले .भाजपचे पठाडे यांना तेरा मते तर काँग्रेसचे सावंत यांना चार मते मिळाली. सदर निवडणूकीत कडेकोट  बंदोबस्तात घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा उपनिबंधक देवयानी भारस्वाडकर यांनी काम पाहिले. हा निकाल ऐकण्यासाठी मोठया  प्रमाणात बाहेर गर्दी झाली होती.भाजपच्या कार्यकर्त्यांनी या वेळी घोषणा देवून आणि फटाके वाजवुन आनंद साजरा केला. खरे तर माजी सभापती संजय औताडे हे  भाजपचेच कार्यकर्ते होते मात्र त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या संचालकांचा पाठिंबा घेवून सभापतीपद मिळविले नंतर भाजपने औतोडेंवरची  संचालकांतली नाराजी लक्षात घेवून औताडे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला आणि औताडे यांना पायउतार व्हावे लागले. आता परत भाजपने बाजी  मारली आहे.