Breaking News

शेतीच्या मालकीवरून झालेल्या भावकीतील तुंबळ मारामारीत वडील आणि मुलाचा मृत्यू

नांदेड, दि. 26, सप्टेंबर - शेतीच्या मालकीवरून झालेल्या भावकीतील तुंबळ मारामारीत थुगावात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला तर सोळाजण जखमी झाले.या  घटनेमुळे अवघे गाव अजूणहि भयभीत अवस्थेत असुन पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. 
नांदेड जवळील थुगावात सर्वे क्रमांक 119 मधील शेताच्या मालकीवरून भोसले कुटुंबातील भावकीत वाद असून हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. हे प्रकरण निकाली  काढण्यासाठी एकत्र आले असता शनिवारी नामदेव भोसले व शिवाजी भोसले यांच्यात वाद झाला नंतर याचे रूपांतर हाणामारीत आणि भयंकर रक्तपातात झाले.यात  महिलाही मागे नव्हत्या. दोनही कुटंबाकडून अनेक सदस्यांनी एकमेकांना काठीने वार केले त्यात आनंदराव भोसले (वय 65) आणि त्यांचा मुलगा श्याम भोसले(वय  36)हे दोघे जागीच ठार झाले.तर आनंदा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.मारोती भोसले, प्रयागबाई भोसले, शीला भोसले, शंकर भोसले, सूरज भोसले, प्रकाश  भोसले, बायनाबाई भोसले, मंजुळा भोसले. दिगंबर भोसले शुभम भोसले, गयाबाई भोसले आदी जखमी झाले आहेत.