Breaking News

ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल - डीझेल, गॅस भाववाढ व महागाई विरोधात आंदोलन

नवी मुंबई, दि. 27, सप्टेंबर - पेट्रोल - डीझेल, गैस भाववाढ व महागाई विरोधात ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने आज जुईनगर येथे करण्यात आले. गाव  देवी चौक जुईनगर येथील पेट्रोल पंप येथे मोदी सरकारच्या व फडणवीस सरकारच्या विरोधात निर्दर्शनहि करण्यात आले. सदर निर्दर्शन हे युवक काँग्रेस अध्यक्ष  निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी निशांत भगत म्हणाले कि शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे विविध कर जनतेवर लादण्यात आली  असून केवळ मुठभर वर्गाच्या हितासाठी सरकारची ही खेळी चालू आहे. दरवाढ कशाप्रकारे केली जात आहे . जनतेची लूट कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे सरकार  करीत आहे आणि 3 वर्षात फ़क्त खोटी अश्‍वासने देवुन नागरिक़ांची फ़सवणुक केली आहे.या प्रसगी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनते मधे जन जागृती करण्यात  आली. निर्दर्शनात युवक काँग्रेसचे प्रभारी ब्रिज दत्त साहेब, ब्लॉक अध्यक्ष संतोष सुतार, युवक विधानसभा अध्यक्ष विजय वाळूंज, जिल्हा पदाधिकारी बंटी सिंग,  रणजीत सिंघ धालीवाल, रोशन थोमस, पूजा जैन, दीपक तारी, संतोष पाटील, बालाजी यादव, अविनाश चव्हाण, विद्या बांदेकर आदी उपस्थित होते. सदर  आंदोलनात कार्याक्रत्याना पोलिसांकडून अटक करून नंतर सोडण्यात आले. तसेच इकण (बनारस हिंदी युनिवर्सिील अनेक विध्यार्थी आपल्या हक्कासाठी आंदोलन  करत असताना रात्री कॅम्पस मध्ये घुसुन त्यांच्या वर पोलिसांकडून मारहाण (लाठीचार्ज) करण्यात आले व सदर हल्ल्यात अनेक विध्यार्थी जखमी होऊन त्यांना गंभीर  धुकापत झाली आहे. सदर हल्ल्याचा देखील निषेध ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने बेटी बचेगी तो बेटी पढेगी सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध कारण्यात  आले.