Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक , पत्रकार अरुण साधू यांचे निधन

मुंबई, दि. 25, सप्टेंबर - साहित्य , पत्रकारिता अशा क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवणार्‍या अरुण साधू यांचे आज येथे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.  गेल्या काही दिवसांपासून शवसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना आज पहाटे त्यांचे  प्राणोत्क्रम झाले. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या पार्थिवावर कोणत्याच प्रकारचे धार्मिक विधी केले जाणार नाहीत. साधू यांनी साहतयविश्‍व  आणि पत्रकारितेत आपले आगळे स्थान निर्माण केले होते . मुंबई दिनांक , त्रिशंकू , सिंहासन, झिप र्‍या या सारख्या साहित्यकृतीतून साधू यांनी आपल्या अफाट  प्रतिभेचे दर्शन वाचकांना घडवले. प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी मुंबई दिनांक , सिंहासन या दोन कादंबर्‍यांवर आधारित सिंहासन या चित्रपटाची निर्मिती केली  होती . इंग्रजी पत्रकारितेत दीर्घ काळ व्यतीत करणार्‍या साधू यांनी या दोन्ही कादंबर्‍यातून आपल्यातील एका श्रेष्ठ पत्रकाराचे दर्शन घडवले. इंडियन एक्स्प्रेस , टाइम्स  ऑफ इंडिया , फ्री प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रांबरोबरच त्यांनी केसरी मध्येही पत्रकारिता केली होती. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे ते सहा वर्षे प्रमुख होते.  सांगली येथे झालेल्या 80 व्या साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. बिनपावसाचा दिवस’ ‘कथा युगभानाची’ हे त्यांचे कथासंग्रही वाचकांच्या अजूनही  स्मरणात आहेत . बहिष्कृत, मुखवटा, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा या कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या.