Breaking News

प्रवास, महागाई भत्ता मिळवण्यात प. बंगालच्या कम्युनिस्ट पक्षाचे खासदार आघाडीवर

नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - प्रवास व महागाई भत्ता मिळवण्यात पश्‍चिम बंगालचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार रितब्रत बॅनर्जी आघाडीवर असल्याचे  माहितीच्या अधिकाराअंतर्गत समोर आले आहे. खासदारांच्या प्रवास भत्त्याबाबतची माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागण्यात आली होती. त्यातून ही बाब समोर  आली आहे.
या माहितीनुसार, लोकसभा खासदारांना एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत प्रवास भत्ता व महागाई भत्ताम्हणून एकूण 95 कोटी 70 लाख 1 हजार 830  रुपये देण्यात आले. तर राज्यसभा सदस्यांना याच कालावधीत 35 कोटी 89 लाख 31 हजार 862 रुपये देण्यात आले. यातील सर्वाधिक खर्च बिझनेस श्रेणीच्या  विमान प्रवासासाठी केला गेल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत समोर आले आहे. राज्यसभेतल्या अधिकांश सदस्यांना एक वर्षात दहा लाखांपेक्षा अधिक प्रवास व  महागाई भत्ता देण्यात आला आहे. यात पश्‍चिम बंगालचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार रितब्रत बॅनर्जी आघाडीवर आहेत. त्यांना आत्तापर्यंत 69 लाख 24 335  रुपयांचा भत्ता देण्यात आला आहे. त्यानंतर विलासी राहणीमानाबद्दल त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेच डी. राजा यांनाही मागील  वर्षात 65 लाख 4 हजार 880 रुपये देण्यात आले आहेत.
तर, तृणमुल काँग्रेसचे खासदार शेखर रॉय यांनीही 61 लाख 72 हजार 271 रुपयांचा भत्ता देण्यात आलेला आहे. अधिक प्रवास भत्ता घेणा-यांमध्ये काँग्रेसचे  ऑस्कर फर्नांडिस, अण्णाद्रमुकच्या त्रिरुचि सिवा, सीपी नारायण, काँग्रेसचे पी. भट्टाचार्य यांचाही समावेश आहे.