श्रीरामपूर तालुक्यात अंगावर वीज पडून युवकाचा मृत्यू
अहमदनगर, दि. 12, सप्टेंबर - नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे शेतात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या सोमनाथ उर्फ राधाकृष्ण शिवाजी जाधव(वय 28)या मेंढपाळ युवकाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार टाकळीभान गावातील मेंढपाळ सोमनाथ जाधव हे आपले वडिल शिवाजी व बंधू संतोष यांच्यासहीत मेंढ्यांना चारण्यासाठी घरातून बाहेर पडले होते.प्रकाश रणनवरे यांच्या पडीक शेतात त्यांनी दुपारच्या वेळी आपल्या मेंढ्या चारणासाठी सोडल्या होत्या. मात्र अचानक वादळी वारा व मेघगर्जनेसह तुफानी पर्जन्यवृष्टी सुरू झाली. विजांचा गडगडाट देखील सुरू होता.जोरदार पाऊस सुरू झाल्याने सोमनाथ आपले वडिल व भाऊ यांच्यासह एका वस्तीवर आश्रयासाठी थांबले होते.मात्र त्यादरम्यान जवळच असलेल्या मक्याच्या शेतात रानडुक्कर सारखे जंगली जनावर दिसल्याने त्यांच्या शेळ्या-मेंढ्या पळू लागल्याने त्यांना आवरण्यासाठी सोमनाथ पुढे गेला.त्याचवेळी विजेचा लोळ त्याच्या अंगावर पडल्याने सोमनाथ तेथेच कोसळला.हा प्रकार पाहून त्याचे वडिल व भाऊ यांनी आरडाओरड करीत तेथे धाव घेतली.शेजारच्या वस्तीवरील लोकांनी व सोमनातला श्रीरामपूरच्या सेंट लुक रूग्णालयात दाखल केले.मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.दरम्यान वादळी पावसाच्या तडाख्याने श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून मोठ्या प्रमाणावर विजेची उपकरणे नादुरूस्त झाल्याचे तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.