पथकर नाक्यावर वाहनचालकांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश,11 जणांना अटक
अहमदनगर, दि. 12, सप्टेंबर - नगर शहरात भिंगार कँन्टोन्मेंट परिसरात नगर-सोलापूर रस्त्यावर पथकर वसुलीच्या नावाखाली वाहन चालकांना राजरोसपणे लुटणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या टोळीतील 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भिंगार कँप पोलीस ठाण्यात सर्व जणांच्या विरूध्द खंडणी वसूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पथकर वसुलीच्या नावाखाली सरू असलेली लूटमार अखेरीस पोलिसांनी उघडकीस आणल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दरम्यान लुटमार करणा-या या टोळीचा प्रमुख कोण याचा पोलीस शोध घेत आहेत.
विजय चव्हाण,अजय कोळी,संदीप भोसले,अजय स्वामी,मंगेश ओव्हळ,पंकज गवळी,वाहीद लाला शेख,अनिल अळकुटे,सागर परदेशी,राजेंद्र गोरे,शुभम लाहोट अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.नगर-सोलापूर रस्त्यावर कँन्टोन्मेंटच्या पथकर नाक्यावर वाहनचालकांची मोठी लूट केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही काळापासून सातत्याने येत होत्या.या पथकर नाक्यावर अधिकृत पथकर केवळ 60 रूपये इतका असतांना वाहनचालकांकडून विशेषत: परराज्यातील ट्रक चालकांकडून तब्बल 400 रूपये वसूल केले जात होते.त्यामुळे नेहमी या रस्त्याने वाहतूक करणा-या काही ट्रक चालकांनी जिल्हा पोलीसस्धिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी थेट संपर्क साधून या लुटमारी बाबत तक्रार केली होती.त्यांच्या सुचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह सोलापूर नाक्यावर छापा घातला. त्यावेळी ट्रक चालकांना केवळ 60 रूपयांची पावती देऊन त्यांच्याकडून 400 रूपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत वरील 11 जणांना अटक केली.आता पोलीस या लुटमार करणा-या टोळीचा प्रमुख कोण आहे याचा शोध घेत आहेत.