Breaking News

तूर विक्री घोटाळा प्रकरणी अकरा जणांना अटक

जालना, दि. 26, सप्टेंबर -  नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री घोटाळ्यातील अकरा संशयितांना काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. नाफेड केंद्रावरील तूर  खरेदी घोटाळ्यात 18 व्यापारी 49 शेतकरी व अन्य तिघांवर पुर्वीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यातील काहीजणांनी न्यायालयात अटकपुर्व  जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळा आता काल रात्री पोलिसांनी भगवान नानासाहेब आनंदे , कैलास गणेश सहाणी, संजय देविदास मिसाळ,  सूदर्शन पाटीलबा भुंंबर, ज्ञानेश्‍वर विठ्ठलराव शिंदे, विशाल नकुलराव भिसे , शरद किसन भुंबर, सतीश चंद्रकांत औषीकर , राजकमल हिरालाल बाहेती व कृष्णा  मुरलीधर पवार यांना अटक केली असून आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.या मुळे एकच खळबळ उडाली आहे.