Breaking News

विसर्जन जवळ आले तरी मंडपांची तपासणी सुरूच

सोलापूर, दि. 01, सप्टेंबर - तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे झोन ते असून, यामध्ये शहराचा मुख्य भाग येतो. मात्र त्यांच्या पथकाकडून फक्त सहा मंडपांचीच  तपासणी झाली आहे. याबाबत सनियंत्रण पथकांचे प्रमुख शिवाजी जगताप यांनी पुन्हा शहरातील मंंडपाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार  गुरुवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. विसर्जनाची तारीख जवळ येऊन ठेपली तरीही वेळकाढूपणा करत कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होत आहे. उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणारी मंडपांची तपासणी करण्यात येत आहे. सनियंत्रण पथकांनी नियुक्त केलेल्या पथकांकडून 21 ते  24 ऑगस्ट या कालावधीत 123 मंडपांची तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल महापालिकेस सादर केला. अहवालाचे स्वरूप पाहता तपासणीची केवळ  औपचारिकता पूर्ण केल्याचे दिसते. अहवालामध्ये मंडप 30 टक्के, 40 टक्के, 50 टक्के रस्त्यावर आहेत. यावरून एकही मंडप सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरत  नाही, असे म्हटले आहे. 21 ते 24 ऑगस्ट कालावधीत तहसीलदार विनोद रणवरे यांनी सहा, तहसीलदार अमोल कदम यांनी 90 तर तहसीलदार कोळेकर यांनी  27 मंडपांची तपासणी केली.