Breaking News

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला श्रीनगरमधून अटक

श्रीनगर, दि. 10, सप्टेंबर - काश्मीरी फुटीरतावादी नेता आणि जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रन्टचा प्रमुख यासिन मलिक याला पोलिसांनी आज शनिवारी श्रीनगर येथून  अटक केली. दिल्लीतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणा यासिनने केली होती. मात्र, त्या आधीच पोलिसांकडून त्याला  अटक करण्यात आली.
9 सप्टेंबर रोजी म्हणजे आजच ‘एनआयए’च्या कार्यलायासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणा सईद अली शहा गिलानी, मीरवाइज उमर फारूख आणि यासिन  मलिक यांनी केली होती. यानंतर उमर फारूख आणि गिलानी यांना श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले.