Breaking News

काश्मीरमधील चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू, दि. 10, सप्टेंबर - दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार  झाला. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात ही चकमक झाली. या भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने दिलेल्या  प्रत्यूत्तरात एक दहशतवादी ठार झाला. चकमक अद्यापही सुरू आहे. या भागात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दलाने  संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.