Breaking News

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली मुख्यमंत्री मुफ्ती यांची भेट

श्रीनगर, दि. 10, सप्टेंबर - जम्मू काश्मीरच्या चार दिवसीय दौ-यासाठी रवाना झालेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग श्रीनगरला पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी  सर्वप्रथम मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. या दौ-यात ते अनंतनाग, जम्मू व राजौरी येथे जाणार आहेत. याशिवाय या कालावधीत ते सामाजिक संघटना,  राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व प्रमुख उद्योजकांची भेट घेणार आहेत.
दौ-यासाठी रवाना होण्यापूर्वी ट्विटच्या माध्यमातून माहिती देताना ते म्हणाले की, केंद्र सरकार काश्मीरमधील प्रत्येक समस्येवर तोडगा काढू इच्छिते. मी माझ्या  दौ-यादरम्यास संवादास इच्छुक प्रत्येकाला भेटणार आहे. ते या दौ-यादरम्यान पंतप्रधान विशेष मदत निधीअंतर्गतच्या योजनांचा आढावा घेणार आहेत. याशिवाय  येथील सुरक्षेसाठीच्या योजनांबाबतची माहितीही घेणार आहेत. अनंतनागमध्ये ते दहशतवाद विरोधी मोहिमेसाठी तैनात असणा-या पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल  व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भेट घेणार आहेत.