Breaking News

अघोषित भारनियमन बंद करा - खा. चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, दि. 14, सप्टेंबर - शहरासह ग्रामीण भागात रात्री- बेरात्री , यावेळी विजेची अचानक भारनियमन महावितरण कंपनीने सुरु केल्याने जनतेचे हाल होत  आहे. याबाबत महसूल क्षेत्र असलेल्या संभाजीनगरात हा नियम लागू होत नाही. तसेच राज्यभरात बरेच जिल्हे यातून वगळेले आहे. कधी कोळसा कमी, कधी दुरुस्ती,  वीजबिल भरले नाही यासारख्या नाहक तक्रारी वीजग्राहकांना सांगून मोकळे होणार्या महावितरणने सर्वाना सामान न्याय द्यावा. तसेच सुरु असलेले अघोषित  भारनियमन बंद करण्याची सूचना शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरणच्या तातडीच्या बैठकीत दिले. महानगरपालिका , महावितरण यांनी  कमीतकमी पाणीपुरवठा काळात वीज बंद करू नये, 3 दिवसानंतर एकदा पाणी येते, त्यात वीज नसली तर खूपच त्रास होत असल्याची तक्रार जेष्ठ स्वतंत्रसैनिक  तारामती लड्डा यांनी केली. बैठकीस सहसंपर्कप्रमुख सुहास दासरथे, आदींसह वीजग्राहक उपस्थित होते.