Breaking News

केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच केंद्रीय लघू व सूक्ष्म उद्योग मंत्री कलराज मिश्र आणि कामगार व रोजगार राज्यमंत्री  बंडारू दत्तात्रेय यांनी आज राजीनामा दिला. 3 सप्टेंबर रोजी होणा-या मंत्रिमंडळातील विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला. या आधी राजीव प्रताप  रूडी, संजीव बालियान, फग्गन सिंग कुलस्ते यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळातील 8 ते 9 जणांना वगळण्यात येणार असल्याची चर्चा चालू  आहे. आतापर्यत तीन मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. अश्‍विनी चौबे, हेमंत बिस्वा, प्रल्हाद जोशी,भुपेंद्र यादव, विनय सहस्त्रबुद्धे,  हरीश द्विवेदी,सुरेश आंगडी आणि सतपाल सिंग यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येण्याची चर्चा चालू आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केल्याचे  सांगितले जात आहे. मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे त्यांनी शहा यांची भेट घेतल्याचे समजते.