Breaking News

अनुदानित गॅस सिलेंडर 7, विना अनुदानित सिलेंडर 74 रुपयांनी महागला

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - देशातील अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 7 रुपये, तर विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 74 रुपयांनी वाढ करण्यात  आली आहे. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.राजधानी दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत 479. 77 रु .होती. ती आता 487. 18 रुपये  झाली आहे. या बरोबरच विना अनुदानित गॅस सिलेंडर 524 रुपयांना मिळत होता. आता तो 598 रुपयांना मिळणार असल्याचे ॠइंडियन ऑईल’ या देशातील  अग्रगण्य तेल विपणन कंपनीने म्हटले आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान प्रणाली बंद करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किमतीत दरमहा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . त्या नुसार
प्रथम दर महिन्याला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत दर महिन्याला चार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. 1  जुलैपासून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर अनुदानित गॅस सिलेंडरवर गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक 32 रुपयांची वाढ करण्यात आली.