Breaking News

पावसाने औंरगाबाद शहराची चांगलीच दाणादाण

औरंगाबाद, दि. 15, सप्टेंबर - पावसाने बुधवारी सायंकाळी औंरगाबाद शहराची चांगलीच दाणादाण उडवली. झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळं शहरात अनेक  कॉलन्यात पाणी शिरले तर धवपटटीवर साचलेल्या पाण्यामुळे औंरगाबाद मार्गे मुंबईला जाणार्या विमानाला वीस मिनीटे हवेत गिरक्या माराव्या लागल्या.
बुधवारी मराठवाडयात अतिवृष्टी झाली. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने विदर्भासह मराठवाड्यात चांगला पाऊस होत आहे. शनिवारपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची  शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी मराठवाड्यातील आठ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. आहे. बीड बायपास, जालना रोडसह अनेक
रस्त्यांवर पाण्याचे तढे साठल्याने ते दीड तास वाहतुकीचा खोळंबाझाला होता तर सेव्हन हिल उड्डाणपूल ते हॉटेलरामगिरीपर्यंत किमान 1 हजार वाहने45 मिनिटे  अडकून पडली होती,जयभवानीनगर चौक पूर्णपणेपाण्यात गेला होता या भागात घराघरात पाणी शिरले होते.बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोलपंपासमोरील चौधरी इस्टेट  भागात चारफूट उंचीवर असलेल्या घरातही पाणी शिरले.तरधावपट्टीवर पाणी साचल्याने दिल्लीहूनऔरंगाबादमार्गे मुंबईला जाणार्या विमानाच्या 20 मिनिटे हवेतच  घिरट्या माराव्या लागल्या.धावपटटीवरचे पाणी गेल्यानंतर विमान खाली उतरले.