सावकारी रक्कम देऊन जमिनीवर कब्जा, 8 जणांवर गुन्हा
सातारा, दि. 11, सप्टेंबर - बेकायदेशीर सावकारी रक्कम देऊन जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी 8 जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, मयत आई वडील यांना बेकायदेशीर सावकारी रक्कम देऊन माझ्याकडून व मयत आई वडीलांकडून मुदत ठेव व दस्त करुन घेतलेल्या रक्कमवर जादा व्याजाची रक्कम लावून त्याचे खरेदी खत करण्यास भाग पाडून आमच्या मालकीची जमीन नावे करुन घेऊन सद्या ते वहावाट करत आहेत.
माझे वडीलांनी व आईंनी व मी घेतलेल्या मुदत ठेव रक्कमेचे थोडे थोडे व्याज दिले असता त्यांनी स्विकारले आहे. तसेच घेतले रक्कमपेक्षा अधिक बेकायदा व्याजाची रक्कम मागत आहेत. म्हणून शिवाजी केरु शेलार रा.मठाचीवाडी,पुष्पा रावसाहेब मुळीक रा. साठे, पोपट केरु शेलार, सचिन शिवाजी शेलार रा. मठाचिवाडी, बाळासो भगवान कापसे रा. कापसेवस्ती, मठाचीवाडी,रुक्मीणी प्रल्हाद सस्ते रा. मठाचीवाडी, आशाबाई राजेंद्र काकडे रा. सरडे, सुरेखा सिकंदर भोसले रा. पिंप्रद यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून मानसिंग आप्पासाहेब कदम यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद असून अधिक तपास पोलीस फौजदार आर. आर. भोळ हे करीत आहे.