Breaking News

संघर्ष कोअर कमिटीची भूमिका 5 ऑक्टोबरला स्पष्ट होणार

जळगाव, दि. 28, सप्टेंबर - राज्यव्यापी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कृती आराखडा समिती व संरचना बांधणी करीता दि. 5 रोजी भूमिका स्पष्ट करण्यात येणार  आहे.
जिल्ह्यातील समाजकार्य महाविद्यालयात पदवी पदवित्तर पदवी प्राप्त व प्रवेशित विद्यार्थ्यांसमवेत दि. 5 रोजी समाजकार्य विद्यार्थ्याचा लढा, राज्यव्यापी आंदोलनाच्या  यशस्वीतेसाठी कृती आराखडा समिती व संरचना बांधणी करीता अमळनेर, चोपडा, उमवी, समाजकार्य महाविद्यालयाचे आजीमाजी विद्यार्थी उपस्थित राहतील.
राज्यव्यापी आंदोलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. याकामी संतोष पवार, संतोष थेरेकर, हेमंत कोळी, दीपक सपकाळे, गायत्री पाटील, विजय गाढे व इतर परिश्रम  घेत आहेत.