गुजरातमध्ये 14 नौकांसह 2 पाकिस्तानी नागरिकांना अटक
अहमदाबाद, दि. 07, सप्टेंबर - भारतीय तटरक्षक दलाने आज गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून तीन पाकिस्तानी नागरिकांसह 14 पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. सुरक्षा दलाला चौकशीदरम्यान कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. अटक करण्यात आलेले हे तीन जण मच्छीमार आहेत. मासेमारी करण्यासाठी त्यांनी भारतात घुसखोरी केल्याची माहिती मिळत आहे. कालही सुरक्षा दलाने तीन नौकांसह दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती.
