Breaking News

फ्लिपकार्टच्या ’फ्रीडम सेल’ची घोषणा, ग्राहकांसाठी खास ऑफर

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - अमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनंही ग्राहकांसाठी नव्या सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा ‘द बिग फ्रीडम सेल’ 9 ऑगस्ट ते 11  ऑगस्टपर्यंत असणार आहे.
या सेलमध्ये मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन, कॅमेरा आणि अक्सेसरीजवर घसघशीत सूट मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये एचडीएफसीच्या क्रेडिट  कार्ड यूजर्संना अतिरिक्त सूटही मिळणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या रेडमी नोट 4ची विक्री तब्बल 72 तास सुरु असणार आहे. पण फ्लिपकार्टनं अद्याप तरी  कोणकोणत्या ऑफर असणार आहेत हे स्पष्ट केलेलं नाही. पण काही ऑफर्सबाबत मात्र माहिती दिलेली आहे.