Breaking News

वर्ल्ड इलेव्हनसोबत पाकमध्ये भारतीय खेळाडू जाणार नाही

लाहोर, दि. 28, ऑगस्ट - पाकिस्तानमध्ये 2009 नंतर पहिल्यांदाच आंरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. यामध्ये केवळ 2015 साली झिम्बाब्वोविरुद्ध  झालेला सामना अपवाद आहे. 2009 मध्ये श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता.
पुढील महिन्यात पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात लाहोरमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड इलेव्हनचं नेतृत्त दक्षिण  आफ्रिकेचा खेळाडू फाफ डूप्लेसी करणार आहे. वर्ल्ड इलेव्हनमध्ये सात देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या मालिकेसाठी खेळाडू पाठवण्यासाठी भारताने नकार  दिला आहे.
वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात 12, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. झिम्बाम्ब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर या  मालिकेसाठी वर्ल्ड इलेव्हनचा प्रशिक्षक असेल. तर खेळाडूंना आयसीसीकडून मानधन देण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज संघ नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौर्‍यावर जाणार  असल्याचीही माहिती आहे. पाकिस्तानने देशात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.