Breaking News

नगरच्या अष्टविनायकातील दुसरा अक्षता गणपती

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गुजरगल्लीतील अक्षता गणपती हे स्वयंभू जागृतस्थान गणेश भक्तांचे विषेश श्रद्धास्थान आहे.आपल्या  घरातील मंगलकार्याच्या अक्षता या गणपतीला सर्वप्रथम देऊन मंगल कार्यारंभ करण्याची प्रथा नगरकरांनी अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने जतन केलेली दिसते.मंगल कार्यारंभ  करणारे हे गणेश मंदिर अक्षता देण्याच्या येथील प्रथेमुळे अक्षता गणपती म्हणून सर्वपरिचित झालेले आहे. या संदर्भात सांगण्यात येणारी अख्यायिका गणपतीच्या  निर्मिती स्थानाकडे लक्ष केंद्रीत करते.मंदिरच्या जागेवर पूर्वी बावडी होती.या बावडीमध्ये नगरकर पुजेचे निर्माल्य व अक्षता टाकत असत.त्यामधून गणपतीची स्वयंभू  मुर्ती प्रकट झाली.हा गणपती नावाप्रमानेच अक्षतासारखा दिसतो.अक्षता गणपतीची ही बैठी मुर्ती ही साडेतीन फूट उंच असून ती उजव्या सोंडेची असल्याने पावन  गणपती म्हणून ओळख आहे.हे मंदिर 350 वर्षापुर्वीचे असावे. पूण्याचे पेशवे या गणपतीचे भक्त होते. क्षीरसागर महाराजांच्या श्रीरामराय महात्म्य या पोथीमध्ये अक्षता  गणपती स्थानाचा उल्लेख मिळतो.अमरेन्द्र गाडगीळ यांच्या श्री गणेशकोश मधिल पान नं.466 वर अक्षता गणपतीची माहिती पहायला मिळते.ब्राम्हण मंडळी विवाह  उपनयनादी मंगलकार्याची अक्षता वाजतगाजत येऊन या गणपतीस देतात.म्हणून यास अक्षता गणपती हे नाव पडले असे लिहिलेले दिसते.भालचंद्र व सौ.मालती जोशी  यांचा मुलगा किशोर आणि मुलगी सौ.मिनाक्षी अरविंद जोशी गणेश भक्ती करतात.गणेशउत्सवात येथे भाविकांची गर्दी होते. एकूणच शहराच्या मध्यवस्तीत असलेला हा  गणपती नवसाला पावनारा म्हणून सर्वपरिचीत झाला आहे.