Breaking News

अंबाबाई मंदिरात महिलांचा गोंधळ, पुजार्‍याला बाहेर काढलं!

कोल्हापूर, दि. 07, ऑगस्ट -  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन आज आणखी तीव्र झालं आहे. श्री पूजक बाबुराव ठाणेकर यांना  पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करू दिल्याच्या निषेधार्थ आज पुजारी हटाव संघर्ष समितीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं.
ठाणेकर पिता-पुत्रावर कारवाईची मागणी करत आंदोलकांनी पुजार्‍यासह प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. धरणे आंदोलन सुरु असतानाच बाबुराव ठाणेकर  पुन्हा मंदिरात गेल्याच समजताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मंदिरात जाऊन केलेल्या घोषणाबाजीनंतर मंदिरात उडलेल्या गोंधळात ठाणेकर यांना पोलीस  बंदोबस्तात मंदिरा बाहेर काढण्यात आलं. यामुळं मंदिर परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं.
अंबाबाई मंदिरातील देवीच्या पेहरावा वरून सुरु झालेल्या वादानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समन्वय बैठकीमध्ये श्री पुजक अजित ठाणेकर आणि त्यांचे  वडील बाबुराव ठाणेकर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश न करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी बाबुराव  ठाणेकर यांनी मंदिरात प्रवेश केला. या प्रकाराबद्दल काळातच  पुजारी हटाव कृती समितीने पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना यांची माहिती दिली.  त्यानंतर पोलिसांनी तत्काळ ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिराबाहेर काढलं होतं.