मदन पाटील युवा मंचच्या कार्याध्यक्षपदी आनंदा लेंगरे यांची निवड
सांगली, दि. 16, ऑगस्ट - मदन पाटील युवा मंचच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी आनंदा लेंगरे यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडीनंतर आनंदा लेंगरे यांचा काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मदन पाटील युवा मंचच्या सांगली जिल्हा मुख्य सचिवपदी प्रविण उर्फ लिंगाप्पा निकम यांना संधी देण्यात आली आहे.
विष्णुअण्णा भवन येथे झालेल्या मदन पाटील युवा मंचच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगली जिल्हा अध्यक्ष तथा सांगली महापालिकेतील युवा नेते नगरसेवक संतोष पाटील यांनी या निवडी जाहीर केल्या. त्यावेळी सांगली महापालिकेचे महापौर हारूण शिकलगार, माजी महापौर किशोर शहा, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. डॉ. सिकंदर जमादार व विष्णुअण्णा पाटील खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील आदी उपस्थित होते. या सर्व निवडी एकमताने जाहीर करण्यात आल्या. नूतन पदाधिका-यांना हारूण शिकलगार व किशोर शहा यांच्याहस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
आनंदा लेंगरे यांची मदन पाटील युवा मंचच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी सलग तिस-यांदा फेरनिवड करण्यात आली. याशिवाय सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्षपदी शीतल लोंढे, तर सांगली शहर अध्यक्षपदी इरफान मुल्ला यांची निवड झाली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सांगली जिल्हा मुख्य सचिव- प्रविण उर्फ लिंगाप्पा निकम, सरचिटणीस- प्रकाश नवलाई, उपाध्यक्ष- रमेश खामकर, संजय कांबळे, प्रकाश मुळके व संजय (पिंटू) पवार, सहसचिव- जीवन बाबर, खजिनदार- महेश कर्णी, सांगली महापालिका क्षेत्र उपाध्यक्ष- अमित लाळगे व अमोल झांबरे, सरचिटणीस- राहूल नवलाई, मिरज तालुका अध्यक्ष- तौफिक कोतवाल, मिरज तालुका पश्चिम भाग अध्यक्ष- सुधाकर नवाळे, उपाध्यक्ष- शेखर पाटील, सांगली शहर कार्याध्यक्ष- मयूर बांगर, तर कुपवाड शहर अध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर आनंदा लेंगरे यांच्यासह मदन पाटील युवा मंचच्या नूतन सर्व पदाधिका-यांनी जयश्री पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांनी कृष्णा नदीकाठावरील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील, सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील व माजी मंत्री मदन पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निवडीनंतर मदन पाटील युवा मंचचे माजी जिल्हा अध्यक्ष अजित सूर्यवंशी, उदय पाटील व माजी कार्याध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनी नूतन पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.