Breaking News

वेश्या व्यवसायाप्रकरणी दोन महिला व दोन पुरुष ताब्यात

सातारा, दि. 27, ऑगस्ट - गुरुवार परज परिसरातील देवर्षी वाड्यातील एका खोलीत वेश्या व्यवसाय होत असल्याप्रकरणी शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा  टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयास्पद दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु  होती. याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवार परज परिसरात गैरप्रकार होत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना समजली होती. त्यानुसार रात्री सात  वाजण्याच्या सुमारास पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. पोलिसांचा छापा पडल्यानंतर त्याठिकाणी संशयितांची पळापळ सुरु  झाली. नागरिकांमध्येही यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांना पाहताच संशयास्पदरित्या पळून जाणा-या 2 महिला व 2 पुरुषांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यानुसार पंचनाम्याला  सुरुवात केली. त्यानुसार तेथे गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. संशयितांना ताब्यात  घेतल्यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोनि सारंगकर यांनी दिली आहे.