Breaking News

सोशल मीडियावरील द्वेष संदेशाना आळा घालण्यासाठी गुजरात सरकार नवीन कायदा आणणार

इलाहाबाद, दि. 05, ऑगस्ट - सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणा-या द्वेष संदेशांना आळा बसावा यासाठी गुजरात सरकार एक विशेष कायदा  आणण्याच्या तयारीत आहे. देव, धर्म, सरकार, नामवंत व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनांविरोधात सोशल मीडियावर द्वेष संदेश प्रसिद्ध करणा-या व तो संदेश  पसरवणा-यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास पोलिसांना या कायद्याची मदत होईल.
याबाबतचे विधेयकाला बुधवारी होणा-या बैठकीत मंत्रिमंडळाद्वारे मंजूरी मिळण्याची शक्यता असून नंतर ते सभागृहातही मंजूर केले जाईल, असे सरकारी सुत्रांनी  सांगितले. भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यासारखे प्रभावी कायदे आपल्याकडे आहेत. मात्र, बरेचदा न्यायालय व अन्य कायदेशीर मंच पोलिसांचा  युक्तीवाद विचारात घेत नाही. शिवाय सध्या असलेल्या तरतुदी अपु-या आहेत, असे ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर सरकार असा नवा कायदा आणण्याच्या तयारीत  असून त्यासाठी सरकारकडून गृहविभाग, कायदा, माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिका-यांना यासाठीचा मसूदा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन  कायद्यांने पोलीस व कायद्याची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांच्या हाती विशेष अधिकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.