आमच्यात व्यक्तिगत अशी कोणतीही स्पर्धा नाही - गोपाळकृष्ण गांधी
नवी दिल्ली, दि. 05, ऑगस्ट - व्यंकैय्या नायडू खूप अनुभवी आहेत. त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात व्यक्तिगत अशी कोणतीही स्पर्धा नाही, असे विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांनी व्यक्त केले आहे. उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक ही संविधानिक मुल्यांसाठीची लढाई असल्याचेही ते म्हणाले. मी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकैय्या नायडू आम्ही दोघांनीही कायदेशीर व सभ्यतापूर्ण पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली, असे ते म्हणाले.
देशातील दुस-या सर्वोच्च पदासाठीच्या म्हणजेच उपराष्ट्रपती पदासाठीच्या मतदानाला आज सकाळी सुरूवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यावतीने व्यंकैय्या नायडू आणि विरोधी पक्षांच्यावतीने गोपाळकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत.