मोदी सरकार भारताला युद्धाच्या दिशेने घेऊन जात असल्याची चीनची टीका
बीजिंग, दि. 05, ऑगस्ट - मोदी सरकार भारताला युद्धाच्या दिशेने घेऊन जात असल्याची टीका चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने आपल्या लेखातून केली आहे. भारत व चीनमधील तणाव युद्धजन्य स्थितीवर येऊन ठेपला असून त्याचे परिणाम जगजाहीर आहेत, असे यात लिहिले आहे. भारताने डोकलाममधून आपले सैन्य मागे घेतले नाही तर युद्ध अटळ आहे. युद्ध झाल्यास त्याचा परिणाम काय असेल हे जगजाहीरच आहे, असे त्यात म्हटले आहे.
मोदी सरकार आपल्या जनतेशी खोटे बोलत आहे. 2017मधील भारत 1962 साली असलेल्या भारतापेक्षा वेगळे आहे. गेल्या 50 वर्षांत दोन्ही देशांमधील सामर्थ्यात बरेच अंतर पडले आहे. जर, मोदी सरकारला युद्ध करायचे असेल तर त्यांनी निदान आपल्या जनतेला सत्य सांगावे, असे या लेखात म्हटले आहे.