Breaking News

जागतिक बॅडमिंटन : अजय जयराचे आव्हान संपुष्टात

ग्लासगो, दि, 25, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अजय जयरामला उप-उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या पाचव्या मानांकित चेन  लाँगने अजयवर 21-11, 21-10 असा सहज विजय मिळवला. चेन लाँगने सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवले. त्याचे दडपण अजयवर आले व त्याला  स्वत:चा नैसर्गिक खेळ करता आला नाही.