Breaking News

जागतिक बॅडमिंटन : सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ग्लासगो, दि, 25, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने हाँगकाँगच्या चेऊंग न्गान यी हिच्यावर 19-21, 23-21, 21-17 असा  विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही लढत अतिशय चुरशीची झाली. पहिला गेम सिंधू जिंकणार असे वाटत असतानाच चेऊंगने बाजी मारली आणि  आघाडी घेतली. दुसरा गेमही अटीतटीचा झाला. चागल्याच लांबलेल्या या गेममध्ये सिंधूने पुनरागमन केले आणि सामन्यात बरोबरी साधली. तिस-या गेममध्येही  अपेक्षेप्रमाणे ’काँटे की टक्कर’ पहायला मिळाली. पण अखेर सिंधूच सरस ठरली. सिंधूची पुढील फेरीतील लढत पाचव्या मानांकित सून यू हिच्याशी होणांर आहे.