पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात चिंतेचे वातावरण, मोठा फटका
औरंगाबाद, दि. 16, ऑगस्ट - जून महिन्यात 17 दिवस पाऊस झाल्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये पावसाच्या दिवसांचे प्रमाण घसरले आहे. जुलैमध्ये नऊ दिवस, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत एकाही दिवस पाऊस झाल्यामुळे मराठवड्यात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. विभागात आतापर्यंत तब्बल 39 तालुक्यांत 60 टक्केही पाऊस झाला नाही. पावसाच्या मोठ्या फटका खरीप पिकांना बसल्यामुळे यंदा उत्पादनाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत तुलनेत पावसाच्या नोंदी चांगल्या तरी पावसातील खंडामुळे पेरण्या वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात प्रारंभी दमदार बरसलेल्या पावसाने जून महिन्यातच पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली होती, मात्र त्यानंतर पावसात मोठा खंड पडला. आतापर्यंत 289.71 मिलिमीटर (55.2 टक्के) पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 32.5 टक्के आहे. खरीप संकटात मराठवाड्यात प्रारंभी झालेल्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर 14 जूनपासून पाऊस गायब झाल्यामुळे दुबार पेरण्यांची स्थिती निर्माण झाली होती, दरम्यान जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पावसाचा शिडकावा झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. या लहरीपणामुळे उत्पन्नाला फटका बसण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 59.2 टक्के, जालना 58.8, परभणी 46.3, हिंगोली 55.2, नांदेड 54.5, बीड 70.5, 71.1 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 75.4 टक्के पाऊस झाला आहे. 38 तालुक्यांत स्थिती गंभीर 12 ऑगस्ट पर्यंत विभागातील औरंगाबाद (56.4), पैठण (32.6 टक्के), सोयगाव (44.2 टक्के), गंगापूर टक्के), खुलताबाद (41.2 टक्के), जालना (53.8 टक्के), परतूर (56.8 टक्के), अंबड (48.7 टक्के), घनसावंगी (55.7 टक्के), परभणी (49.5 टक्के), पालम (38.5 टक्के), गंगाखेड टक्के), सोनपेठण (53.6 टक्के), सेलू (51.4 टक्के), पाथरी (33.7 टक्के), जिंतूर (40.3 टक्के), मानवत (43.6 टक्के), कळमनुरी (34.7 टक्के), वसमत (47.1 टक्के), अर्धापूर (59.3 टक्के), (48.4 टक्के), लोहा (56.8 टक्के), किनवट (59.6 टक्के), माहूर(43.2 टक्के), हदगाव (58.00 टक्के), हिमायतनगर (37.6 टक्के), देलगूर (35.8 टक्के), बिलोली (48.4 टक्के), धर्माबाद (50.7 नायगाव (46.5 टक्के), मुखेड (52.3 टक्के), गेवराई (47.1 टक्के), वडवणी (58.00 टक्के), माजलगाव (56.5 टक्के), परळी (52.5 टक्के), उदगीर (57.6 टक्के) व जळकोट (51.9 या तालुक्यांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडयात सर्वत्र चिंतेचे ढग; 39 तालुक्यांत 60 टक्केही पाऊस नाही.
