Breaking News

महापुरुषांच्या जयंत्या विचार पेरण्याचे काम करत असतात : प्रा.खिल्लारे

बुलडाणा, दि. 09 - अण्णाभाऊ साठे यांचा जन्म गरीबी आणि सतत सामाजिक अवहेलना सोसणार्‍या मागास जातीत झाला. दिड दिवसाचं शाळेचं शिक्षण घेऊन  बाहेर पडलेले अण्णाभाऊ आपल्या आजुबाजुला होणारे अन्याय अत्याचार पाहत होते. मुबंईला आल्यानंतर कम्युनिस्ट      चळवळीशी त्यांचा संबंध आला, वाचन  वाढले आणि भाऊची बंडखोरी आपल्या लेखणीतून आकार घ्यायला लागली. पोवाडा, तमाशा, नाटक, कथा कांदबरी मधून उपेक्षित, शोषीत, दलित माणसांचे दु:ख  वेदना, प्रश्‍न तळमळीने ते मांडू लागले. जातीने व स्त्रीयांच्या गुलामीने उध्वस्त झालेल्या समाजाला आपल्या साहित्यातून समाजा समोर उघडं करत होते. माणूस जगला  पाहिजे, हा मंत्र घेऊन ते शोषणाला नकार देत समतेचा पुरस्कार करत विद्रोहाची भुमिका घेत होते. अशा समाज हितासाठी लढणार्‍या महापुरषांच्या जयंत्या या  दिशाहीन होत चाललेल्या समाजाला योग्य रस्ता दाखवण्याचे काम करतात. युवावर्गात उत्साह व जागृत करण्याचे काम करत असतात त्यामुळे असे कार्यक्रम समाजात  झाले पाहिजे कारण महापुरषांच्या जयंत्या या विचार पेरण्याचे काम करत असतात, असे विचार चोखासागर नामकरणाचे शिल्पकार प्रा. कमलेश खिल्लारे यांनी  अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त देऊळगांव राजा पिंपंळनेर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना काढले. या वेळी विचारपिठावर प्रा.श्याम मुडे,  दिलीपभाई खरात, नगरसेविका कटारेताई, गवईताई, शिंगणे हे होते. तर अध्यक्षस्थानी टेकाळे सर हे होते.
प्रा. श्याम मुडे यांनी तरुणांनी वाचन केल्याशिवायमहापुरुष कळणार नाही, असे सांगत अण्णाभाऊ कसे घडले हे सांगितले. तर दिलीपभाई खरात यांनी युवकांनी  पायावर उभे राहत समाजाचे उतराई झाले, पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात टेकाळे सरांनी काळाची पावलंओळखा आणि शिक्षणाला महत्व द्या! यासाठी  महिलांनी पुढाकार घेतला पाहीजे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशभाऊ यांनी केले तर प्रस्ताविक श्रीमंत निकाळजे यांनी केले. आभार श्याम लोखंडे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा  विचार मंच पिंपळणेरचे राजु कांबळे,राहुल दंडे, गणेश पाटोळे, रघुनाथ पाटोळे, विठ्ठल पाटोळे यांनी  परिश्रम घेतले. यावेळी महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने   उपस्थित होता.