Breaking News

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीचे मतदान उत्साहात

बुलडाणा, दि. 09 - जिल्हा नियोजन समिती निवडणूक - 2017 साठी आज 8 ऑगस्ट 2017 रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात  मतदान झाले. या निवडणूकीसाठी 14 मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक जिल्हा परिषद  सदस्य मतदारांकरीता, तर एक नगर परिषद सदस्य मतदारांकरीता होते. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य   मतदारांकरीता  मतदान  केंद्राची व्यवस्था होती. जिल्ह्यात एकूण 97.23 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
या निवडणूकीकरीता स्त्री 204 व पुरूष 157 मतदार होते. अशाप्रकारे एकूण मतदारसंख्या 361 होती. त्यापैकी बुलडाणा (नागरी), चिखली, दे.राजा, सिं.राजा,  लोणार, मेहकर, खामगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा, मोताळा व मलकापूर मतदान केंद्रावर 100 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मात्र मोताळा  94.12, शेगांव 96.30 व बुलडाणा (ग्रामीण) येथे 86.60 मतदानाची नोंद करण्यात आली.
मतदान केंद्र, मतदान केलेले पुरूष व स्त्री मतदार संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा (ग्रामीण) : स्त्री- 29, पुरूष 23, बुलडाणा (नागरी) : स्त्री 18 व पुरूष 11,  चिखली : स्त्री 14 व पुरूष 13, दे.राजा : स्त्री 12 व पुरूष 7, सिं.राजा : स्त्री 10 व पुरूष 7, लोणार : स्त्री 9 व पुरूष 8, मेहकर : स्त्री 13 व पुरूष 12,  खामगांव : स्त्री 18 व पुरूष 16, संग्रामपूर : स्त्री 9 व पुरूष 8, जळगांव जामोद : स्त्री 10 व पुरूष 9, नांदुरा : स्त्री 15 व पुरूष 9, मलकापूर : स्त्री 14 व पुरूष  15, मोताळा : स्त्री 10 व पुरूष 6,  शेगांव : स्त्री 15 व पुरूष 11.