Breaking News

मुंबईत उद्या चर्मकार समाजाचे प्रचंड धरणे आंदोलन

बुलडाणा, दि. 09 - चर्मकार समाजावर जातीय वाद्यांकडून होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध 10 ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीने  सरकार विरोधात प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार असून चर्मकार समाजातील सर्वच घटकांनी आपआपल्या राजकिय संघटना, पक्ष बाजुला ठेवून 10 ऑगस्ट  रोजी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चर्मकार ऐक्य परिषदेचे समन्वयक पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून चर्मकार समाजाच्या हितासाठी कार्य करणार्‍या अनेक संघटनांन मिळून चर्मकार समाजावर होणारे अन्याय अत्याचार वपाढल्याने संघटित होवून  हिंदुत्ववादी सरकार विरोधात लढा उभारण्यासाठी चर्मकार ऐक्य परिषदेची स्थपणा करण्यात आली असून याच परिषदरेच्या माध्यमातून संपुर्ण माहराष्ट्रात पुढील  काळात प्रचंड आंदोलन तिव्र करणार असल्याचे पुरुषोत्तम बोर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  10 ऑगस्ट रोजी 10 वाजता मुंबई आझाद मैदानावर  होणार्‍या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मागास्वर्गीयांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे. बुलडाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथील पिडितेला 50 लास  रुपये देवून पुनर्वसन करावे सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नामांकित सरकारि वकिलांची नियुक्ती करावी, भाजप सरकारच्या काळात मागास्वर्गीयांवर  झालेल्या अन्याय अत्याचाराची आयोगामार्फत चौकशी करण्यात यावी. चर्मकार आयोगाची स्थापना करावी. संत रविदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळातील  कर्ज धारकांची कर्जमुक्ती करावी, जिल्हा कार्यालयात तात्काळ पदभरती करुन जिल्हास्तरावर 500 कोटी रुपये निधि उपलब्ध करुन उपयोगी योजना कार्यान्वित  कराव्यात. संत रविदास यांचे सत्य चरित्र व लिखानाबाबत शासकिय अभ्यास मंडळाची मंत्रालयात संशोधन समिती स्थापन करावी. रविदास जयंती शासकिय स्तरावर  साजरी करावी व सार्वजनिक सुट्टी द्यावी. मुंबईत 5 एकर जमीनीवर संत रविदास स्मारक निर्माण करावे, नगर परिषद, महानगर पालिका हद्दीतील शासकिय दुकान  गाळे, खुले भुखंड समाज हितासाठी आरक्षित ठेवावेत, प्रत्येक जिल्ह्यात चर्मकार उद्योग केंद्रे निर्माण करुण चर्मकार समाजातील कारागिरांना विविध सोई सुविधा  उपलब्ध करुन द्याव्यात आरक्षित कोट्यावर उमेदवार न सापडल्यास खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या मनुवादाला जोपासणारा शासन निर्णय सरकारणे तात्काळ रद्द करावा  इत्यादी मागण्यांसाठी चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीने आमदार बाबुराव माने, इंजि.चंद्रप्रकाश देगलुरकर, अशोक कानडे, संजय खामकर, लक्ष्मण घुमरे, पुरुषोत्तम  बोर्डे यांच्या नेतृत्वात प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनाली गवळी, राम कदम,  स्वप्निल मोरे, नामदेव कदम, व्यंकट दुदंबे, रवि घोलप, गणेश बोरकर, अ‍ॅड. नारायण गायकवाड, ज्ञानदेव वर्पे, शांताराम कांबळे, जगन्नाथ वाघमारे, दिपचंद जैसवार,  इश्‍वर ताथवडे, सुर्यकांत कदम, शारदाताई नवले प्रतिमा चिंचोले, प्रकाश शिंदे, राजन शिंदे, विजय घासे, संजय खरुळे, शरद खरात, इंजि.शिवाजी जोहरे, सचिन  चंद्रे, के.एम.वैरी, प्रकाश डोंगरे, समाधान चिंचोले, शेषमल शिंगणे इत्यादींनी केले आहे.