Breaking News

नगरचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील विशाल गणेशाचीमूर्ती नावाप्रमाणेच विशाल म्हणजे साडेअकरा फूट उंच आहे.या  पुर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणेशाची बैठक नेहमीपेक्षा वेगळी असून मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे,तर डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे.गणेशोत्सवातील  विसर्जन मिरवणूकीत पहिला मान विशाल गणपतीचा असतो. मंदिरच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून तेथे भव्य संगमरवरी मंदिर उभे आहे.कोरिव,नक्षीदार  असलेले देखणे लाकडी मंदिर संगमरवरी अशा सुंदर,अप्रतिम मंदिरात रुपांतरीत झाले आहे.एका दानशुर व्यक्तीच्या देणगीतून गणपतीच्या मस्तकावर पावनेचार  लाखाचा हिरा बसवण्यात आला आहे.यामुळे गणेशमूर्ती अधिक सुंदर दिसत आहे.या मंदिराला किमान 250 वर्षापुर्वीचा इतिहास आहे.दररोज त्रिकाळ पूजा आणि  नाथपंथीय आरतीचे वैशिष्ट्ये येथे वेगळे आहे.दररोज शेकडो तर चतुर्थीला हाजारो भाविक दर्शनास येतात.गणेशोत्सव,गणेश जयंती,गुरु पौर्णिमा आदि उत्सव येथे  साजरे होतात.जयंती उत्सवात सामुदायिक अथर्वशिर्ष,गणेश उत्सवात गणेशयाग,अग्निहोम आदी कार्यक्रम होतात.भाविक भक्तांचे हे तिर्थक्षेत्र आहे.  विशाल गणेश  मंंडळाचे पदाधिकारी अभय अगरकर, पंडितराव खरपुडे, रामकृष्ण राऊत आदी.