Breaking News

डाळिंब पीक हे दुष्काळी भागाला वरदान- आ. थोरात

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - कमी पर्जन्यमान असलेल्या संगमनेत तालुक्यात आपल्या कृषीमंत्री पदाच्या काळात सर्वात जास्त शेततळे झाली. शेततळ्यांना  डाळिंब पीकाची जोड मिळाल्याने या पिकाच्या उत्पादनात संगमनेर तालुक्याने राज्यात आघाडी मिळवली असून डाळिंब हे पीक दुष्काळी भागाला वरदान ठरले आहे,  असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल व कृषीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
येथील कुबेर लॉन्स येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व संगमनेर तालुका सहकारी अ‍ॅग्रो कंपनीच्यावतीने आयोजित डाळींब उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी शंकर खेमनर, शिवाजीराव थोरात, अ‍ॅड. सुहास आहेर, सतिषराव कानवडे, आर. बी. राहणे, विष्णुपंत राहटळ,  संपतराव गोडगे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, शास्त्रज्ञ डॉ. किरण कोकाटे, डॉ. विजय सुपे, डॉ. जोत्सना शर्मा, डॉ. अनिल दुर्गुडे, डॉ. अशोक  वाळुंज, डॉ. निलेश गायकवाड, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले,  डॉ. अजय कुदळे  आदी उपस्थित होते. याप्रसंगी रोग व किड नियंत्रण माहिती पुस्तिकेचे  प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.