Breaking News

श्रीमल खूनप्रकरणातील आठ जणांना न्यायालयीन कोठडी

सोलापूर, दि. 26, ऑगस्ट - प्रवलिका श्रीमल यांच्या खून प्रकरणात अटकेत असेल्या आठ जणांना अक्कलकोट न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. पती नरहरी  रामदास श्रीमल (वय 35, रा. लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ), प्रेयसी - विनोदा नागनाथ संदूपटला (वय 33, रा. नवीन विडी घरकुल कुंभारीजवळ, घर नंबर -  651-4, सोलापूर), अंबुबाई कनकी, महादेवी होनराव, नरेश अंबादास मंत्री (वय 22). बालाजी दत्तात्रय दुसा (वय 23), अंबादास किसन ओतर (वय 21, रा.  तिघेही विजयनगर, सोलापूर) अमर श्रीनिवास वंगारी (वय 25, रा. विडी घरकुल, कुंभारी) हे आठजण अटकेत होते. व्यंकटेश वडनाल यांनी वळसंग पोलिसात तक्रार  दिली आहे. तपासात नवीन मुद्दा नाही. पण, प्रत्यक्ष घटना पाहणारे, नेत्र साक्षीदार, घटनास्थळाचे पुरावे जमा करण्यात येत आहेत अशी माहिती सहायक पोलीस  निरीक्षक महेश भाईकट्टी यांनी दिली. आणखी कुणाचा यात सहभाग आहे का याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे.