Breaking News

‘कटपुतली नृत्य’ ठरत आहे खामगांवकरांसाठी आकर्षण

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते गणरायाची आरती

बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट - खामगाव शहरातील फरशी येथे जय संतोषी माँ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना करण्यात आली  असून मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत.
यावर्षी मंडळाने औरंगाबाद, जालना येथील कलाकारांचा समुह असलेला महाराष्ट्राची संस्कृती व लोककला जपणारा गोंधळ, लावणी यासह विविध बहारदार कार्यक्रम  सादर केले. यासोबतच मंडळाने सुरत येथील नावाजलेला कठपुतली नृत्याचा देखील देखावा आणलेला असुन हा देखावा खामगांवकरांसाठी विशेष आकर्षण ठरत  आहे. हे कार्यक्रम पाहण्याकरीता नागरीकांची जय संतोषी माँ मंडळासमोर खामगांवकरांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. मंडळाभोवती आकर्षक अशी भव्य विद्युत  रोषणाई करण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जय संतोशी माँ मंडळाला भेट देउन  गणरायाची आरती करून  मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, नगरसेवक राणा अमेयकुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा श्रीमती  सरस्वतीताई खासने, युवक काँग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार चंदेल, प्रितम माळवंदे यांचा जय संतोशी माँ मंडळाच्या वतीने   पुश्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.  यानंतर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी   कलाकारांचे स्वागत करून  तोंडभरून कौतुक केले व उपस्थित राहुन या कलाकारांचा उत्साह वाढविला.
यावेळी जय संतोषी माँ मंडळाचे अध्यक्ष गोविंदभाऊ मिश्रा, गोपाल अग्रवाल, प्रकाश आप्पाजी वानखडे, पप्पु मिश्रा, रवि जोशी, संदीप त्रिवेदी, कुणाल ठाकुर,  स्वप्नील जयपुरीया, कालु पुरोहित, पणु ठाकुर, नरेंद्र काळे, शुभम मिश्रा, बबलु मिश्रा, विजय निंबाळकर, शुुभम पालीवाल,निलेष जामोदे, रुपेश अवस्थी, नरेंद्र  बक्तारीया, राहुल मिश्रा, राकेश मिश्रा यांच्यासह जय संतोशी माँ गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व श्री गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.