Breaking News

दारु दुकाने आज बंद

नांदेड, दि, 25, ऑगस्ट - गणेश चतुर्थी व बकरी ईद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. या सण उत्सव काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था  राहण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व  सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल/बीआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. या आदेशाचा  भंग करणार्‍या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.