सांगलीच्या गणपती मंदिरात साकारले दोन हत्तींचे पुतळे
सांगली, दि. 25, ऑगस्ट - सांगलीकरांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणार्या श्री गणपती पंचायतन संस्थानकडील बबलू व सुंदर गजराज या दोन हत्तींची आठवण जागविणारे दोन भव्य पुतळे सांगली नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपती मंदिरात उभारण्यात आले आहेत. ऐन गणेशोत्सवात सांगली संस्थानचे अधिपती विजयसिंह पटवर्धन यांनी सांगलीकरांना आपल्या अमृत महोत्सवी ही अनोखी भेट दिली आहे. विजयसिंह पटवर्धन यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गुरूवार दि. 24 ऑगस्ट रोजी या हत्तींच्या दोन पुतळ्यांचे अनावरण होणार आहे.
बबलू हत्तीच्या मृत्यूनंतर गणेशभक्तांनी सातत्याने श्री गणपती पंचायतन संस्थानला हत्तीची मागणी केली होती. थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी संस्थान स्थापनेपासून म्हणजे सन 1801 पासून गजपालनाची सुरू केलेली समृध्द परंपरा बबलू हत्तीच्या निधनानंतर सन 2007 पासून खंडित झाली होती. वन्यजीव कायद्यातील जाचक अटी व तरतुदीमुळे अनेक संस्थानिकांना गज पालन करणे मुश्किल झाल्याने सांगलीकरांची नवा गज आणण्याची मागणी श्री गणपती पंचायतन संस्थानला पूर्ण करता आली नाही.
परंतु विजयसिंह पटवर्धन यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून गजराजांच्या दोन 14 फुटी भव्य प्रतिकृती उभ्या करण्याचा निर्धार श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने करण्यात आला होता. सध्या गणपती संस्थानचा दैनंदिन कारभार पाहणारे विजयसिंह पटवर्धन यांचे जावई हिमालयराजे यांनी ही जबाबदारी स्वीकारून ऐन गणेशोत्सवात या दोन गजराजांचे पुतळे मंदिरात आणले आहेत. लाल दगडाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाताच मध्यभागीच्या कारंजाच्या दोन्ही बाजूस हे हत्तींचे दोन पुतळे उभारण्यात आले असून त्यांच्या अनावरणाचा कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला आहे.
गुरूवार दि. 24 ऑगस्ट हा विजयसिंह पटवर्धन यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे. त्यानिमित्त सांगलीकरांच्या हृदयात स्थान असणार्या बबलू व सुंदर गजराज या दोन हत्तींच्या मुर्तीचे अधिकृतरित्या सांगलीकरांना दर्शन होणार आहे. पाच दिवसांच्या गणपती संस्थानच्या उत्सव कालावधीत लाखो भाविक श्री गणपती मंदिराला भेट देतात. या उत्सवात या दोन मुर्तींमुळे या भाविकांचा आनंद द्विगुणीत होणार आहे. विजयसिंह पटवर्धन यांनी श्री गणपती पंचायतन संस्थानची जबाबदारी स्वीकारल्यापासून सौंदर्य चौक व मंदिर परिसर यांच्यात आमुलाग्र सुधारणा केल्या आहेत. त्यात गणपती मंदिराची सजावट, रंगकाम, कारंजे, आकर्षक विद्युत रोषणाई, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, सुनिती भवन, अन्नछत्र, मंगल कार्यालय, संस्थान संस्थापक चिंतामणराव पटवर्धन यांचा पुतळा व नवग्रह मंदिर यांचा समावेश आहे.