Breaking News

अभेद्य प्रतिष्ठानच्या पाककला स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - गणेशोत्सवा निमित्त सारसनगर येथील अभेद्य प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत महिलांनी उत्सफुर्त सहभाग  नोंदवून एकाहून एक सरस असे विविध प्रकारचे स्वादिष्ट व पौष्टिक खाद्य पदार्थ बनविले.स्पर्धेच्या ठिकाणी या नाविण्यपुर्ण खाद्य पदार्थास सजवून आकर्षक पध्दतीने  मांडण्यात आले होते.सदर स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गणेशोत्सवा निमित्त विद्यार्थी व महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अभेद्य प्रतिष्ठाणच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पाककला स्पर्धेचे  परिक्षण वैशाली मालपाणी व पूजा बिहाणी यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उज्वला विधाते,रसिका विधाते,अलका मुंदडा,कोमल विधाते,प्राजक्ता  गाडळकर,आश्‍विनी भंडारे,छाया गाडळकर,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मयुर विधाते,राहुल गाडळकर,वैभव शिंदे,राजूशेठ आवारे,नेहा मुंदडा,अनिल पालवे,राजू गीते,सुभाष  जगताप,दत्ता कराळे,दर्शन विधाते, विजय कोहक,कुणाल पिंपळे,रवी बोडखे,उध्दव ठाकरे,प्रभाताई भोंग,महेश राऊत,अजिंक्य विधाते,सागर गाडळकर आदि उपस्थित  होते.
वैशाली मालपाणी म्हणाल्या की,अन्न हे पुर्णब्रम्ह आहे. प्रत्येक गृहिणी उत्तमच पकवान बनवित असते.या स्पर्धेत नाविण्यपुर्ण असलेल्या पौष्टिक खाद्य पदार्थाला बक्षिसे  दिले जाणार आहेत.प्रत्येक व्यक्ती अन्न पहिले डोळ्यांनी अनुभवतो व नंतर तो खातो.यासाठी बनविलेल्या खाद्य पदार्थाची सजावट अत्यंत महत्त्वाची आहे.पाककलेत  पारंपारिक खाद्यांना वेगळा रुप देवून सादर केल्यास ते चवदार व पौष्टिक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या परिक्षण नंतर उपस्थित नागरिकांनी महिलांनी  बनवलेल्या या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.यावेळी घेण्यात आलेल्या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत लहान मुले व महिलांनीसहभाग घेऊन विविध आकर्षक बक्षिसे मिळवली.  अ‍ॅड.सुनिल मुंदडा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी सारसनगर येथील सर्वमंगल कार्यालयात ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे प्रवचन होणार  असून यावेळी आ.अरुण जगताप यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार आहेत.मंडळाच्या गणपतीस प्रसाद म्हणून नागरिकांना शालेय साहित्य  देण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.