श्रीलंकेचा धुव्वा, टीम इंडियाचा दणदणीत विजय
शिखर धवननं 90 चेंडूंत 20 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 132 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं 70 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 82 धावांची खेळी केली. त्याआधी, अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी त्रिकूटानं श्रीलंकेचा डाव 216 धावांत गुंडाळून भारताच्या विजयाचा पाया रचला. त्या तिघांच्या प्रभावी मार्यासमोर श्रीलंकेची दोन बाद 139 धावांवरून 216 धावांत घसरगुंडी उडाली. भारताकडून अक्षर पटेलनं 34 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. केदार जाधवनं 26 धावांत दोन, तर यजुवेंद्र चहलनं 60 धावांत दोन विकेट्स काढल्या.
