Breaking News

गरजू नागरिकांसाठी कोलकातामध्ये ‘फूड एटीएम’ सुरु

कोलकाता, दि. 24, ऑगस्ट - गरीब आणि गरजू नागरिकांना जेवणाची सुविधा मिळावी यासाठी कोलकातामध्ये ‘फूड एटीएम’ची सेवा सुर करण्यात आली आहे.  आसिफ अहमद या रेस्टॉरंट मालकाच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या फूड एटीएमच्या निर्मितीसाठी तीन संस्थांनी मदत केली आहे. 320 लीटरची क्षमता  असलेल्या फूड एटीएम सुरु करण्यासाठी रोटरी, राऊंड टेबल आणि जेआटीओ या संस्थांचा समावेश आहे. 
यासाठी हॉटेलच्या बाहेर एक पारदर्शक दरवाजा असलेले एटीएम ठेवण्यात आले आहे. ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे, की जेवण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले  अन्न फेकून न देता पॅक करुन दान करावे. हॉटेल व्यतिरिक्त शहरातील अन्य नागरिकही शिल्लक जेवण या एटीएममध्ये ठेऊ शकतात,अशी माहिती अहमद यांनी दिली.