Breaking News

रावेरला गणेश चतुर्थीनिमित्त शांतता कमेटीची बैठक

रावेर, दि. 21, ऑगस्ट - गणेश उत्सवात प्रबोधनात्मक देखावे,शिस्त बद्ध मिरवणूक काढणार्‍या जिल्हयातील गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाकडून बक्षीसे  देण्यात येतील. गणेशोत्सव,बकरी ईद ,व आगामी सण उत्सव शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे  बोलतांना व्यक्त केले. येथील सार्वजानिक गणेश उत्सव मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 
गणेश उत्सव,बकरी ईद,व आगामी उत्सवाच्या पार्श्‍वभुमिवर काल रात्री येथे शांतता सामितीची बैठक झाली. यावेळी श्री कराळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की जिल्हयात आपला तालुका सुजलाम सुफलाम आहे. व्यसनाधिनता,दंगल,जातिय तणाव,या मुळे गावाची  प्रगती होत नाही. व्हॉट़स् अ‍ॅप व सोशल मिडिया वर आक्षेपार्ह मजकुरामुळे समाजा,समाजात तणाव निर्माण होतो. असा मजकुर आल्यास प्रशासनाशी संपर्क  साधावा. तसेच अशांतता निर्माण करणार्‍यांवर कडक कारवाईची भुमिका घेईल. येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.  धार्मिक उत्सवाचे पावित्र्य राखुन हा उत्सव उत्साहात साजरा करावा. चांगल्या उपक्रमा साठी प्रशासन आपल्या पाठिशी आहे.
जिल्हाधिकारी कीशोर राजे निंबाळकर म्हणाले की, गणेश उत्सव संपूर्ण भारतात व परदेशातही साजरा होतो.या मुळे हा उत्सव राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतिक  आहे. ग्रामपंचायत अथवा पालिका असो त्यांनी उत्सवकाळात स्वच्छता ठेवावी, या साठी चौदाव्या वित्त आयोग निधिचा वापर करावा. या वेळी सार्वजनिक  उत्सव मंडळाचे अध्यक्ष पिंटू महाजन यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे, स्वच्छता,उत्सव काळात वीज खंडित होऊ नये याबाबत मनोगत व्यक्त केले.  नगराध्यक्ष दारा मोहंमद,शेख शफी,कपील महाराज यांनी विचार व्यक्त केले, तर अ‍ॅड. एम ए खान,राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सोपान पाटील,माजी  नगराध्यक्ष पद्माकर महाजन, यांनी सुचना मांडल्या. या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिह,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेद्र रायसिंग, तहसीलदार  विजय कुमार ढगे, गटविकास आधिकारी सोनिया नाकाडे, वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, वीज आभियंता योगेश पाटील,उपनगराध्यक्षा रंजना गजरे,माजी नगराध्यक्ष  हरिष गनवाणी,माजी उपनगराध्यक्ष सुधिर पाटील, नगरसेवक सुरज चौधरी, अयुब खाँ पठान, शेख सादिक, असदुल्ला खाँ, डॉ. सुरेश पाटील, शेख गयास  उपस्थित होते.