कोणत्याही पक्षासाठी, पक्षाविरोधात ही निवडणूक लढवत नाही - व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली, दि. 05, ऑगस्ट - मी कोणत्याही पक्षाकडून किंवा पक्षाविरोधात ही निवडणूक लढवत नसून भारताच्या उपराष्ट्रपतिपदासाठी लढत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकैय्या नायडू यांनी केले. बहुतेक सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्या सर्व पक्षांचे खासदार मला मतदान करतील असा विश्वास आहे. शिवाय, मी सर्व सदस्यांना ओळखतो आणि तेदेखील मला ओळखतात. यामुळे मी प्रचारदेखील केलानसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यकैय्या नायडू यांच्यासह विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांनीही उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीसाठी मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याशिवाय खासदार आणि बॉक्सिंगपटू मेरी कोम, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आदींनी संसदेत उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान केले.