Breaking News

महापौर मुक्त टिळक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. 31, ऑगस्ट - शतकोत्तर रौप्य महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्ताने पुणे महानगरपालिकेने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने छायाचित्र  प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मुक्त टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सभागृह  नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ आदी उपस्थित होते.
आज (गुरुवार) दिनांक 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत सारसबागेसमोरील महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेना  प्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या छायाचित्र प्रदर्शनात गणेशोत्सवातील विविध कालावधीतील, विविध  प्रसंगानुरूप छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहे. त्याचबरोबर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख व व्यंगचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे  तसेच पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था यांची छायाचित्रे व माहिती, त्रिशुंड गणपती मंदिर, चतु:श्रृंगी मंदिर, पर्वती मंदिर, सारसबाग मंदिर, दगडूशेठ  मंदिर, पाताळेश्‍वर मंदिर, वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, शनिवारवाडा, नानावाडा, विश्रामबागवाडा, आगाखान पॅलेस, महात्मा फुले वाडा, शिंदेची छत्री, डेक्कन  कॉलेज, अभियांत्रिकी महाविदयालय, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एनडीए, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे विमानतळ, पुणे शहरातील रस्ते, अशा  विविध विषयाशी संबंधित छायाचित्रे व माहिती प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहे.