Breaking News

16 वर्षे हिंमतीने लढलेल्या 2 साध्वी व न्यायाधीशांना नगरमध्ये अभिवादन

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदा या पंथाचे महागुरूुरमीत रामरहीम यांच्या लैंगिक अत्याचारां विरुद्ध गेली 16 वर्ष संघर्ष करणार्‍या 2 महिला तसेच या  प्रकरणी सर्व दबाव झुगारून 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देणारे न्यायाधीश जगदीप सिंग तसेच या प्रकरणी प्रामाणिक तपास करणार्‍या सी.बी.आय.अधिकारी व  कर्मचाारी यांना नगरमध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या साक्षीने तरुणाईने अभिवादन केले.यावेळी नागरिकांनी देशातील महिलांची  सुरक्षा सन्मान आणि प्रतिष्टा यांसाठी निर्भय कृतीची शपथ देण्यात आली.
मीना पाठक,निवृत्त पोलीस अधिकारी अविनाश बुधवंत,नाना भोरे,अ‍ॅड.शाम असावा,तुलसी पालीवाल,हनीफ शेख,नितीन वावरे,गहिनीनाथ बडे,अमर साळवे,रमेश  खेडकर,प्रशांत आंधळे,रोहित गहिले,सोमनाथ लोंढे,राहुल पवार,प्रशांत पवार,सचिन बोरुडे,दीपक बुराम,ममिता पावरा,दीक्षा सातपुते,प्रियांका सोनवणे,दीपा  मिन्नरवार,विकास सुतार,प्रवीण बोरा,आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवृत्त पोलीस अधिकारी अविनाश बुधवंत म्हणाले की काँग्रेस,भाजपासह सर्व  राजकीय पक्ष,केंद्र व हरियाना आणि पंजाब राज्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी डेरा सच्चा सौदा या पंथाचे महागुरू बाबा गुरमीत रामरहीम यांच्या दर्शनाला तसेच  राजकीय पाठिबा मागण्यासाठी गेले दीड दशक सातत्याने जात होते.या राजकीय दबावामुळे बाबा गुरमीत रामरहीम यांच्या वरील खून व बलात्काराचे अनेक गुन्हे  सातत्याने दडपले गेले.16 वर्षे सलगपणे ही साध्वी बलात्काराची केस चालत राहिली.या निकालाने सर्व राजकीय पक्षांचे खरे चारित्र्य उघड केले.नाना भोरे म्हणाले  की,हे सर्व प्रकरण वर्ष 2002 मध्ये उघड करणारे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांचा खून करण्यात आला.हा निकाल म्हणजे भारतातील लोकवादी निर्भीड पत्रकारितेचा  मोठा विजय आहे. शिल्पा केदारी म्हणाल्या की,भारत सरकारने,पंतप्रधान,राष्ट्रपती यांनी प्रकरणातील तक्रारदार मुलीना भारत कन्या पुरस्कार देऊन  गौरवावे.आतापर्यंत त्यांच्या त्याग आणि धाडसाची कुठलीही दखल न घेऊन आपला बाणेदारपणा सर्वच राजकीय पक्षांनी दाखून दिला.या संबधी भारतातील सर्व  प्रमुख राजकीय पक्षांच्या अद्याक्षांना तसेच सर्व मंत्र्यांना निषेधाची 5000 पोस्ट कार्ड नगर जिल्ह्यातून पाठवण्याचे आवाहान रोहित संबळ यांनी केले.या उपक्रमाचे  आयोजन स्नेहधार प्रकल्प आणि युवानिर्माण प्रकल्प व स्वयंसेवी संस्थांचा महासंघ यांनी केले होते.